मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 1 मार्चपासून पाणीकपात? पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ‘इतका’च पाणीसाठा

| Updated on: Feb 15, 2024 | 12:34 PM

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ ४८ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. चिंताजनक म्हणजे ३ वर्षातील सर्वात कमी पाणी साठ्याची नोंदही करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : मुंबईकरांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत येत्या १ मार्चपासून १० टक्के पाणी कपात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा अपुरा असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ ४८ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. चिंताजनक म्हणजे ३ वर्षातील सर्वात कमी पाणी साठ्याची नोंदही करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. १३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धरणात असणारा पाणीसाठा हा असा आहे., मोडकसागर धरणात ४२.७२ टक्के, तानसा धरणात ५७.५७ टक्के, मध्य वैतरणा धरणात ८.७७ टक्के, भातसा धरणात ४८.७७ टक्के, विहार धरणात ५८.६२ टक्के तर तुळशी धरणार ५८.८४ टक्के इतका पाणीसाठी शिल्लक आहे.

Published on: Feb 15, 2024 12:34 PM
भारतातच नाही तर युरोपातील ११ देशात शेतकरी आंदोलनाचं घमासान, मागणी नेमकी काय?
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज फैसला, कोणाचे आमदार होणार अपात्र?