संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना कोणी दिली 100 कोटींची ऑफर? काय आहे प्रकरण?
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा रोज सकाळी सरकारवर हल्लाबोल, मात्र यंदा त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी काय केला मोठा दावा? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोजच सकाळी सरकारवर तुटून पडतात. मात्र यावेळी त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊतांनी मोठा दावा केलाय. ठाकरे यांना सोडण्यासाठी आजही 100 कोटींची ऑफर असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. आपल्याला आजही ठाकरेंसोडून सोबत येण्यासाठी 100 कोटींची ऑफर असल्याचा दावा संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी केला आहे. कार्यकर्त्यांसमोर बोलतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियातही व्हायरल होतोय. सुनिल राऊत, संजय राऊतांचे भाऊ आहेत आणि ते विधानपरिषदेचे आमदार सुद्धा आहेत. ऑफर संदर्भातला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी त्यात मंत्रिपदाचीही ऑफर होती, असा पुन्हा दावा केला तर राऊतांना 100 रुपयाचीही कोणी ऑफर देणार नाही, अशी खिल्ली भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उडवली आहे. बघा काय म्हणाले नितेश राणे…
Published on: Aug 30, 2023 11:44 PM