Kirit Somaiya | गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

| Updated on: Sep 20, 2021 | 2:08 PM

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कराडमध्ये पोलिसांनी उतरवलं होतं. तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळआ बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने (Mahalaxmi Express) कोल्हापूरला (Kolhapur) निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या त्याच कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत आहेत.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 20 September 2021
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1 PM | 20 September 2021