100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 August 2021
बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून 20 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ही संचारबंदी लागू असणार आहे.

आमदार गोपीचंद पडळकर कोर्टाची बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नियमबाह्य शर्यतीचे आयोजक, संयोजक, स्पर्धक, बघ्यांवरही गुन्हे दाखल करणार, असे स्पष्ट करत कोणत्याही स्थितीत बैलगाडी शर्यती होवू देणार नाही, असा पवित्रा पोलीस व महसूल प्रशसानाने घेतलाय. प्रांताधिकारी संतोष भोर, डीवायएसपी अश्विनी शेंडगे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी झरे येथील बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने बैठक घेत त्या टाळण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनाही बैठकीला निमंत्रीत करण्यात आले होते. आमदार पडळकरांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते.