100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 19 September 2021
आज अनंत चतुर्दशीनिमित्त दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे
प्रथम पूजनीय गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता, असे मानले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत देशाच्या विविध भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती घरी आणून त्यांची विशेष पूजा करतात. आज अखेर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.