100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 October 2021

| Updated on: Oct 27, 2021 | 10:34 AM

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी तसेच आर्यन खान अटक प्रकरणात पंच असलेले प्रभाकर साईल यांना एनसीबीने समन्स बजावलं आहे. त्यांनी आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबीचे अधिकारी पैसे उकळणार होते, असा गंभीर आरोप केलाला आहे. याच आरोपानंतर चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे. 28 ऑक्टोबर रोजी साईल यांना एनसीबीसमोर हजर राहावे लागणार आहे.

साईल यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत एनसीबीने चौकशी पथक नेमलेलं आहे. पाच अधिकाऱ्यांचं हे पथक दिल्लीहून मुंबईला येत आहे. याच पथकाकडून साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी हे अधिकारी साईल यांचीदेखील चौकशी करणार आहेत. याच कारणामुळे साईल यांना समन्स पाठवण्यात आले आहे. समन्सनुसार परवा म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी प्रभाकर साईल यांना चौकशीसाठी पथकासमोर उपस्थित राहावं लागणार आहे.

प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हे अंधेरी पूर्वेला येथे राहतात. ते केपी अर्थात किरण प्रकाश गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत आहे. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होते. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावीने त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर गोसावीने साईलला बॉडीगॉर्ड म्हणून नेमलं होतं.

KP Gosavi | क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी लखनौमधून फरार
36 जिल्हे 50 बातम्या | 27 October 2021