100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 October 2021
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळाला आहे. तब्बल 25 दिवसांपासून कारागृहात असलेला आर्यन लवकरच बाहेर येणार आहे. आर्यनला जामीन मिळावा म्हणून ज्येष्ट वकील मुकुल रोहतगी यांनी जिवाचं रान करून कोर्टासमोर बाजून मांडली. कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आता अभिनेता शाहरुख खान याने वकिलांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सध्या समोर आले आहेत.

गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाच्या याच निकालानंतर अभिनेता शाहरुख खान हर्षोल्हासित झाला आहे. मुलाला जामीन मिळाल्याचा आनंदात त्याने आपल्या वकिलांची भेट घेतली आहे. तसेच त्याने विकालांचे आभार मानले आहेत.