100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 3 November 2021
शिवसेनेच्या दैदिप्यमान विजयानंतर नेतेमंडळी सेना पक्षनेतृत्वाचं आणि खासदार संजय राऊत यांचं कौतुक करतायत, त्यांना शुभेच्छा देतायत. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आलाय. आम्हाला आनंद आहे, दु:ख असण्याचं काहीच कारण नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. पण या शुभेच्छांबरोबरच त्यांनी सेनेला चिमटेही काढले आहेत, तसंच टोलेही लगावले.
दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवला. दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. दादरा नगर हवेलीच्या विजयासह शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया केली. शिवसेनेच्या दैदिप्यमान विजयानंतर नेतेमंडळी सेना पक्षनेतृत्वाचं आणि खासदार संजय राऊत यांचं कौतुक करतायत, त्यांना शुभेच्छा देतायत. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आलाय. आम्हाला आनंद आहे, दु:ख असण्याचं काहीच कारण नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. पण या शुभेच्छांबरोबरच त्यांनी सेनेला चिमटेही काढले आहेत, तसंच टोलेही लगावले.
Published on: Nov 03, 2021 09:11 AM