100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 4 October 2021
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शकता आहे. कोर्टात आर्यनची बाजू सुप्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे मांडणार आहेत. मानेशिंदेंनी संजय दत्तपासून रिया चक्रवर्ती पर्यंत अनेक हायप्रोफाईल केसेस लढवल्या आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार नाहीत, कालच त्यांनी आर्यनची दोन दिवसांची कोठडी मागितली होती, पण किला कोर्टाने ती दिली नाही. केवळ एका दिवसाची कोठडी दिल्याने आता एनसीबी अधिक कोठडी मागणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सोमवारी आर्यनची न्यायालयीन कोठडी संपणार आहे, त्यापूर्वी त्याचे वकील सतीश मानेशिंदे जामिनासाठी दुपारी दोन वाजता अर्ज करणार असल्याची माहिती आहे. आर्यन खानसह अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिघांनाही आज (4 ऑक्टोबरपर्यंत) एनसीबीच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.