100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 7 September 2021

| Updated on: Sep 07, 2021 | 9:37 AM

चिपळूण परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे. चिपळूणमध्ये असाच पाऊस सुरू राहीला, तर मात्र समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे.

चिपळूण परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे. चिपळूणमध्ये असाच पाऊस सुरू राहीला, तर मात्र समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केलेय. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यानं शहरामध्ये जाहीर आवाहन करण्यात आलं आहे. वाशिटी नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कत राहण्याचे आवाहन करण्यात आलेय. चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चिपळुणकरांनी रात्र जागून काढली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले, तर पाऊस असाच सुरू राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केले आहे.

Published on: Sep 07, 2021 09:36 AM
Ratnagiri Rain| रत्नागिरीत दापोलीत मुसळधार पावसाचं थैमान, दापोली बाजारपेठेत साचलं पाणी
Ratnagiri Rain| दापोलीत मुसळधार पावसाचं थैमान, दापोली बाजारपेठेत साचलं पाणी