100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 August 2021
बजरंग पुनियानं दुसऱ्या राऊंडमध्ये लागोपाठ 6 गुण मिळवतं आघाडी भक्कम केली आणि त्याचं विजयामध्ये रुपातंर केलं आहे. बजरंग पुनियानं कांस्य पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील राजकीय नेत्यांनी बजरंग पुनियाचं अभिनंदन केलं आहे.
भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत 2 पॉईंट घेतले. 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकूच कायम ठेवली. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून 2 पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी 2 पॉईंट घेऊन, आपली आघाडी 6-0 अशी केली. अखेर बजरंग पुनियानं मॅच 8-0 अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली. कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होती. बजरंग पुनिया या मॅचमध्ये पहिल्यापासून सकारात्मक खेळ करताना दिसून आला. पहिल्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाला 2-0 अशी आघाडी मिळाली होती. प्रतिस्पर्धीखेळाडू सुरुवातीपासून नकारात्मक खेळ करताना दिसून आला.
Published on: Aug 08, 2021 08:45 AM