100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 October 2021
पुण्यात अजित पवारांच्या बहिणींच्या घरी धाड टाकली गेली तसंच खुद्द अजित पवारांनी त्यांच्या कारखान्यांवर धाड टाकल्याचंही सांगितलं. सायंकाळी खुद्द शरद पवारांनीही त्यावर होय मी त्या धाडीबद्दल ऐकल्याचही सांगितलं. ह्या सगळ्या घडामोडींवर राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच पहिल्यांदाच दिल्लीतून आयकर विभागानं प्रेस नोट जारी केलीय.
पुण्यात अजित पवारांच्या बहिणींच्या घरी धाड टाकली गेली तसंच खुद्द अजित पवारांनी त्यांच्या कारखान्यांवर धाड टाकल्याचंही सांगितलं. सायंकाळी खुद्द शरद पवारांनीही त्यावर होय मी त्या धाडीबद्दल ऐकल्याचही सांगितलं. ह्या सगळ्या घडामोडींवर राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच पहिल्यांदाच दिल्लीतून आयकर विभागानं प्रेस नोट जारी केलीय. ह्या प्रेस नोटमध्ये नेमक्या कुणाच्या घरी धाडी टाकल्या किंवा अजित पवार यांचा, किंवा नातेवाईकांचा असा कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. पण गेल्या 6 महिन्यांपासून आयकर विभाग काय करतंय, त्यांना कुठल्या व्यवहाराची माहिती मिळालीय, ते व्यवहार किती कोटींचे आहेत, यात कोण आहेत, कुठले कोडनेम आहेत, याची थोडक्यात माहिती दिलीये.