Nashik | लासलगावसह 108 गावं कोरोनामुक्त
हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्याची आता दिवाळीत कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्याची आता दिवाळीत कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटांनी नाशिक जिल्ह्याला चांगलेच जेरीस आणले. विशेषतः दुसऱ्या लाटेनंतरही निफाड तालुका हा गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वीही हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. यादरम्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही सातत्याने 100 ते 125 हून अधिक राहत होती. मात्र, आता ही संख्या 50 च्या जवळपास आली आहे. यात कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह निफाड तालुक्यातील 108 गावे कोरोनामुक्त झाली असून, पंचवीस गावात 58 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांनाही लवकरच डिस्चार्ज मिळत आहे. त्यामुळे तालुका लवकरच कोरोनामुक्त झालेला पाहायला मिळले.