Nashik जवळील देवळाली ते लहवीतदरम्यान Pawan Express चे 11 डब्बे रुळावरुन घसरले

Nashik जवळील देवळाली ते लहवीतदरम्यान Pawan Express चे 11 डब्बे रुळावरुन घसरले

| Updated on: Apr 03, 2022 | 8:13 PM

या ट्रेनच्या भीषण अपघातात एकाच मृत्यू (Railway Accident Death) झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत, जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. या अपघातानंतर अनेक गाड्याही रद्द कराव्या लागल्या आहेत. अनेक गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.

नाशिक : नाशिकमध्ये आज एक मोठा रेल्वे अपघात झालाय. कारण एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे अनेक (Pawan Express) डबे रुळावरून घसल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या ट्रेनच्या भीषण (Railway Accident) अपघातात एकाच मृत्यू (Railway Accident Death) झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत, जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. या अपघातानंतर अनेक गाड्याही रद्द कराव्या लागल्या आहेत. अनेक गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. या अपघातामुळे मनमाड पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली, असल्याची माहित देण्यात आलीय. एकूण तीन गाड्या रद्द करणयात आल्या आहेत, त्यात सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेसही या अपघातामुळे रद्द करण्यात आली आहे आणि अदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेसही रदद करण्यात आली आहे, अशी माहिती सेट्रेल रेल्वकडून देण्यात आली आहे.

स्वत:चा काळा पैसा मतदारांच्या खात्यात Paytm ने ट्रान्सफर होणार आहे – Chandrakant Patil
आम्ही Raj Thackeray यांच्या पाठिशी – Mohit Kamboj