पुणे न्यूज, व्हॅलेंटाईन डेसाठी ११ लाख गुलाब दाखल
सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी सुरु झाली असताना पुणे शहरात ११ लाख गुलाब आले आहे. गुलाबाच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे.
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय महत्वाचे घडलंय, जाणून घेऊ या टॉप न्यूज ९ मध्ये. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे ऊस तोडणी सुरू असताना ऊसाच्या शेतात तीन बिबट्याचे बछडे आढळून आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या तीन बछड्यांपैकी एक नर जातीचा आहे. हा बछडा मयत आढळून आला आहे. दोन मादी बछड्यांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी सुरु झाली असताना पुणे शहरात ११ लाख गुलाब आले आहे. गुलाबाच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे.
Published on: Feb 13, 2023 10:56 AM