Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेत 12 ‘भामट्या’ भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?

| Updated on: Sep 13, 2024 | 4:43 PM

संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. त्यात १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले.

Follow us on

महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र आता या योजनेत फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला. १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे पाहायला मिळाले. आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास बहिणी ऐवजी १२ भावांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला. त्या लोकांनी फक्त महिलेचे छात्राचित्र वापरले. हा प्रकार समोर आल्यानंतर १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या १२ जणांव्यतीरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सादर झालेल्या अर्जांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.