Special Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense ? -Tv9
विधासभा अधिवेशनात भाजपच्या 12 सदस्यांना निलंबित केलं होतं. या सर्व आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. या निर्णयाचं भाजपने (bjp)जोरदार स्वागत केलं आहे.
विधासभा अधिवेशनात भाजपच्या 12 सदस्यांना निलंबित केलं होतं. या सर्व आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. या निर्णयाचं भाजपने (bjp)जोरदार स्वागत केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. त्यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. फडणवीस यांनी सत्यमेव जयते म्हणत कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) निर्णयाने महाविकास आघाडील सणसणीत चपराक बसली आहे. राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर होता. संविधानाला धरून नव्हता, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं आहे. दरम्यान, फडणवीस आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर अधिक सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सत्यमेव जयते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात आमच्या आमदारांनी आवाज उठवला. त्यावेळी या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि कोर्टाचे आभार मानतो. कोर्टाचा हा निर्णय लोकशाही मूल्य वाचवणारा असून दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीला सणसणीत चपराक लगावणारा आहे. या सरकारने घेतलेला हा निर्णय असंवैधानिक होता. नैतिकमूल्यांना धरून नव्हता. निरपेक्ष नव्हता. हा निर्णय बेकायदेशीर होता, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.