Kirit Somaiya |12 नोव्हेंबरच्या दंगलीबाबत ठाकरे सरकाच्या नेत्यांच्या प्रतिक्रीया विसंगत कशा?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील आघाडी सरकारवर धक्कादायक आरोप केले आहेत. अमरावतीत हजारो लोक रस्त्यावर आले होते. त्यावेळी पोलिसांना तात्काळ सूचना गेल्या. हे होऊ द्या, असं पोलिसांना सांगितलं गेलं, असा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमरावती हिंसाचारातील पीडितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या हिंसाचारावरून सोमय्या यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ले चढवले. 12 तारखेला हजारो लोकं रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही. पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या, असा दावा सोमय्या यांनी केला.