Breaking | भाजपच्या 12 निलंबित आमदारांची फडणवीसांच्या सागर निवासस्थांनी बैठक
भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा एकवटले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे आमदार जमले असून पुढील रणनीतीवर खलबतं सुरू झाली आहेत.

आज सकाळी 11च्या सुमारास निलंबित बाराही आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जमले आहेत. पुढील रणनीती काय ठरवायची याबाबतची चर्चा करण्यासाठी हे आमदार फडणवीस यांच्या निवासस्थानी जमले आहेत. या बैठकीत कोर्टात जाण्यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत? कोर्टात बाजू कितपत टिकून धरेल, केरळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो, आदी बाबींवर यावेळी चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.