Ambeghar landslide : आंबेघरमध्ये 14 ते 16 लोक दबले, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये

| Updated on: Jul 24, 2021 | 1:42 PM

पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये (Ambeghar landslide) दरड कोसळून 14 ते 16 लोक दबले आहेत. 23 जुलैला तुफान पावसाने आंबेघरमध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर आली.

पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये (Ambeghar landslide) दरड कोसळून 14 ते 16 लोक दबले आहेत. 23 जुलैला तुफान पावसाने आंबेघरमध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती समोर आल्यानंतर 35 तास उलटले तरीही अजून मदत आणि बचावकार्यासाठी इथे यंत्रणाच पोहोचली नाही. टीव्ही 9 मराठीचे कराडचे प्रतिनिधी दिनकर थोरात (Dinkar Thorat) हे चार तासांची पायपीट करत, डोंगर, दरे, ओढे, नाले पार करत आंबेघरमध्ये पोहोचले.

आंबेघर हा एक पाडा आहे. या गावात 8 घरं होती. यापैकी 4 घरांवर दरड कोसळून या घरातील 14 ते 16 लोक दबले आहेत. दुर्घटनेला 35 तास होऊन गेले मात्र मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिकांनी या गावात धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं.

Taliye Landslide | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेला गावाला रवाना, दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार
Raigad Taliye Landslide | मी बाहेर पडतोय तोपर्यंत घर पडलं, तळीयेतील ग्रामस्थाची आपबिती