शिंदे-फडणवीसांसह १५ मंत्री आज पोहरा देवीच्या दौऱ्यावर, यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी
शिंदे-फडणवीसांसह १५ मंत्री आज पोहरा देवीच्या दौऱ्यावर, वाशिममध्ये ५९३ कोटी विकास कामांची पायाभरणी करण्यात येणार
मुंबई : शिंदे-फडणवीसांसह १५ मंत्री आज पोहरा देवीच्या दौऱ्यावर असणार आहेत. वाशिममध्ये ५९३ कोटी विकास कामांची पायाभरणी करण्यात येणार आहे. काँग्रेसची आज मुंबईत बैठक होणार असून अंतर्गत वादावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे, प्रभारी एच पी पाटील यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. चिंचवडमध्ये नाना काटे यांच्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक होणार असून अजित पवार, नाना पटोले आणि निलम गोऱ्हे यांच्या उपस्थित जाहीर सभा होणार आहे. चिंचवडमध्ये आज भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता हे उद्घाटन होणार आहे. ठाकरे गटाचा जैन धर्मानंतर उत्तर भारतीय मतांवर डोळा, आज उद्धव ठाकरे गोरेगावच्या उत्तर भारतीयांच्या अभियानात हजर राहणार आहेत.
Published on: Feb 12, 2023 07:55 AM