शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन कोट्यवधींची फसवणूक, कुठं घडला धक्कादायक प्रकार?

| Updated on: Sep 01, 2023 | 8:00 PM

Nagpur Farmer Fraud | नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन तब्बल ११३ कोटींची फसवणूक, धक्कादायक प्रकरण उघडकीस, नागपूर ग्रामीण पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

नागपूर, १ सप्टेंबर २०२३ | नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊ कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण पुढं आलंय. या प्रकरणात जिल्ह्यातील १५१ शेतकऱ्यांची तब्बल ११३ कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आलीय. या प्रकरणाचा तपास आता नागपूर ग्रामीण पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय. आरोपींनी गोदामात असलेले शेतकऱ्यांचे धान्य बँकेत गहाण ठेवत त्या मोबदल्यात ११३ कोटींचं कर्ज घेतले. नागपूर जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी, रामटेक या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणुक झालीय. 2017 वर्षी हे कर्ज घेण्यात आलं होतं. आता बँकेने शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. सरकारकडून ओल्या दुष्काळासाठी आर्थिक मदत मिळणार आहे असं सांगत शेतकऱ्यांकडून शेतीचे कागदपत्रे घेण्यात आली. काही शेतकऱ्यांची बोगस कागदपत्रे सुद्धा तयार करण्यात आली. यासंदर्भात शेतकऱ्यांनी मौदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. मौदा पोलीसांनी १८ पेक्षा जास्त जणांविरुद्ध कट रचून फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

Published on: Sep 01, 2023 08:00 PM
Sharad Pawar | मराठा आंदोलकांवर बळाचा वापर ही गृहमंत्र्यांची सुचना होती का? शरद पवार यांचा सवाल
Maratha Reservation Protest | जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, काय घडला प्रकार?