राज्यभरात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप, संपाला कुणाचा पाठिंबा अन् कोण सहभागी?
VIDEO | सरकारी कार्यालयांसह प्रशासकीय कामकाजावर ताण? संप मागे घेण्याच्या आवाहनानंतरही कर्मचारी ठाम
मुंबई : राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, काही सरकारी विभागातील कामकाज ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जुन्या पेन्शनवरून कर्मचारी बेमुदत संपावर असून संप मागे घेण्याच्या आवाहनानंतरही कर्मचारी ठाम असल्याचे राज्यभरातून दिसून येत आहे. या संपात सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तर या जुन्या पेन्शन योजनेची मागणी घेऊन महापालिका, नगरपालिका आणि सफाई कामगार यांचा या संपाला पाठिंबा आहे.
Published on: Mar 14, 2023 05:15 PM