Maratha Reservation : बीडमध्ये जरांगेंच्या सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त, ड्रोन, 1800 पोलिसांचा फौजफाटा अन्…
मराठा आरक्षणासंदर्भात 24 डिसेंबर रोजी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज सरकारला काय इशारा देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने बीडमध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आलाय.
बीड, २३ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बीडमध्ये इशारा सभा पार पडणार आहे. तब्बल 100 एकर परिसरात ही सभा पार पडणार असून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेसाठी बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सभास्थळापर्यंत भगवे झेंडे आणि बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण बीडचं वातावरण भगवंमय झालंय. मराठा आरक्षणासंदर्भात 24 डिसेंबर रोजी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज सरकारला काय इशारा देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने बीडमध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आलाय. या सभेसाठी संपूर्ण बीड शहरात 1800 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Published on: Dec 23, 2023 03:21 PM