चंद्रपुरातील सागवान लाकूड जाणार थेट अयोध्येत !
VIDEO | राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुख्य आगारातून अयोध्येसाठी 1855 घनफूट लाकूड नेले जाणार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून अयोध्येच्या राम मंदिरासाठी पाठविल्या जाणाऱ्या सागवान लाकडाची काष्ठपूजन झाल्यावर भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर- चंद्रपुरात जय्यत तयारी केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे लाकूड विक्री केंद्र आहे. राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुख्य आगारातून अयोध्येसाठी 1855 घनफूट लाकूड नेले जाणार आहे. या लाकडावर विविध प्रक्रिया करून कलाकुसरीसह अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहासाठी लाकूड वापरले जाणार आहे. या 2 जिल्ह्यातील लाखो रामभक्तांसाठी ही घटना महत्वपूर्ण ठरली आहे. याआधीही इथले लाकूड नव्या संसद इमारतीसाठी वापरले गेल्याने देशात आलापल्ली व बल्लारपूरच्या सागवान लाकडाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.