Mumbai Corona | मुंबईत आज 19 हजार 474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 7 रुग्णांचा मृत्यू -tv9

| Updated on: Jan 09, 2022 | 8:18 PM

मागील तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजाराच्या पुढे होता. तो आज 19 हजारावर आला आहे. दुसरीकडे पुण्यातील रुग्णांचा आकडा मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारनं 10 जानेवारीपासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवी नियमावलीही (New Corona Guidelines) शनिवार जाहीर करण्यात आली आहे. अशावेळी मुंबईतील काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कारण मागील तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजाराच्या पुढे होता. तो आज 19 हजारावर आला आहे. दुसरीकडे पुण्यातील रुग्णांचा आकडा मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 19 हजार 474 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी मुंबईत सलग तीन दिवस कोरोना रुग्णांची संख्या 20 हजाराच्या पुढे गेली होती. 8 जानेवारी रोजी मुंबईत 20 हजार 318 नवे रुग्ण सापडेल होते. 7 जानेवारी अर्थात शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. त्याआधी 6 जानेवारी अर्थात गुरुवारी मुंबईत 20 हजार 181 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Published on: Jan 09, 2022 08:18 PM
मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे- खडसे-tv9
Special Report | राज्यात कोरोना निर्बधाचा फेरा पडताच राजकीय ‘घेरा’ सुरु -tv9