तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली; दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

| Updated on: May 24, 2022 | 3:51 PM

या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांना वाचवण्यात यशं आलंय. 16 पर्यटक सुखरुप आहेत.

सिंधुदुर्ग : मालवणच्या तारकर्लीमध्ये (Tarkarli, Malvan) खळबळजनक घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली समुद्रात बुडाल्यानं (Boat Drown in Tarkarli, Sindhudurg News) खळबळ उडाली. या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांना वाचवण्यात यशं आलंय. 16 पर्यटक सुखरुप आहेत. बोट (Scuba Diving in Tarkarli) बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीन बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 16 जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणांना यश आलंय. मात्र दोघा जणांचा पाण्यात बुडून, नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला आहेय. तर अन्य दोघा पर्यटकांचा बुडताना वाचवण्यात आलं असलं, तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Published on: May 24, 2022 03:51 PM
Devendra Fadnavis | ‘मोदींचं सरकार म्हणजे माझं सरकार,जनतेमध्ये विश्वास
ज्ञानवापी मशीदीप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी