सकाळी 9 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील बातम्यांचा आढावा
'माझ्या मनात कोणतीही खदखद नाही मी भाजपची सच्ची कार्यकर्ता', पंकजा मुंडेंनी नाराजीची चर्चा फेटाळली.. यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारी तीन वाजता होणार असून या सुनावणी करते संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच धनुष्यबाणावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये भर पावसात राहुल गांधी यांच्यासह संजय राऊत यांची पदयात्रा…. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही मी भाजपची सच्ची कार्यकर्ता असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजीची चर्चा फेटाळली… मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास मुंबईचा कायापालट करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएमसी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. तर वेळ काढा आणि रोज १५ मिनिटं योगा करा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…