२० क्विंटल पुलाव, खिचडी अन् पाण्याच्या हजारो बाटल्या… मनोज जरांगे यांच्या सभेत खाण्यापिण्याची तगडी व्यवस्था

| Updated on: Dec 23, 2023 | 2:08 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बीडमध्ये इशारा सभा पार पडणार आहे. तर जरांगेंच्या सभेला येणाऱ्या मराठ्यांसाठी जेवणाची जंगी व्यवस्था करण्यात आली आहे. सभेला येणाऱ्या मराठ्यांची कोणतीही खाण्या-पिण्याची आबाळ होऊ नये, म्हणून तगडी व्यवस्था

Follow us on

बीड, २३ डिसेंबर २०२३ : बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची आज इशारा सभा पार पडणार आहे. राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमपूर्वीची ही शेवटची सभा असणार आहे. या सभेसाठी बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सभास्थळापर्यंत भगवे झेंडे आणि बॅनरबाजी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बीडमध्ये इशारा सभा पार पडणार आहे. तर जरांगेंच्या सभेला येणाऱ्या मराठ्यांसाठी जेवणाची जंगी व्यवस्था करण्यात आली आहे. सभेला येणाऱ्या मराठ्यांची कोणतीही खाण्या-पिण्याची आबाळ होऊ नये, म्हणून साधारण 3 टन साबुदाण्याची खिचडी तयारी करण्यात आली आहे. तर २० क्विंटल पुलाव देखील करण्यात आला आहे. आज एकादशी असल्याने २ क्विंटल साबुदाणा खिचडी तयार करण्यात आलीय यासोबत ४ लाख पाणी बॉटलची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती तेथील मराठा समन्वयकांनी दिली.