काँग्रेसचे 20-22 आमदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात? राज्यसभा निवडणुकीत विरोधात मतदान करणार?

| Updated on: Feb 13, 2024 | 1:23 PM

१६ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीचा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. राज्यसभेच्या सहा जागांकरता संपूर्ण राज्यात निवडणूक घेतली जात आहे. त्याकरता राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. नुकताच काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केले.

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : येत्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे २० ते २२ आमदार विरोधात मतदान करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर सूत्रांची माहिती आहे. १६ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीचा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. राज्यसभेच्या सहा जागांकरता संपूर्ण राज्यात निवडणूक घेतली जात आहे. त्याकरता राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. नुकताच काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केले. तर आज पक्ष प्रवेश होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत यावर शिक्कामोर्तब केलंय. आज ते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे येत्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची शक्यता आहे. ४२ आमदार काँग्रेसकडे आहे. तर पक्षातील नाराजी उघडपणे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसचे सर्वाधिक आमदार राज्यसभेच्या मतदानावेळी फुटण्याची शक्यता आहे.

Published on: Feb 13, 2024 01:23 PM