सकाळी 8 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील बातम्यांचा आढावा
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमात हजेरी लावणार असून जाणून घ्या आणखी दिवसभरात कोणत्या मोठ्या घडामोडी घडणार आहेत…
येत्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुखपदाची मुदत संपणार, निवडणूक आयोगाचा निर्णय न आल्याने पेच निर्माण झाला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
वर्षा बांगला येथे निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर शिंदे फडणवीस यांच्यात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. धनुष्य बाण कोणाला मिळणार याचा निर्णय 30 जानेवारी रोजी निर्णय होणार असून निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे आणि शिंदे गटाला लेखी उत्तर दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आज पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहे. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. यासह आणखी जाणून घ्या दिवसभरात मोठ्या घडामोडी घडणार आहेत…