वरळी स्पामध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं; मृत व्यक्तीच्या मांड्यांवर ‘ती’ 22 नावं अन्…
खंडणीच्या त्रासाला कंटाळून वरळीतील २ स्पा मालकांनी हत्येची सुपारी दिली होती. ६ लाख रूपयांची सुपारी देऊन गुरूसिद्धया वाघमारे याची हत्या करण्यात आली आहे. तर या हत्या झालेल्या गुरूसिद्धया वाघमारे याच्या दोन्ही मांड्यांवर २२ नावं गोंदवली होती. २२ नावं त्या हत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
वरळीतील स्पामध्ये झालेल्या हत्येच्या घटनेने वरळी चांगलीच हदरली होती. मात्र आता या हत्या प्रकरणात एक नवं अपडेट समोर आलं आहे. वरळीतील स्पामध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून वरळीतील २ स्पा मालकांनी हत्येची सुपारी दिली होती. ६ लाख रूपयांची सुपारी देऊन गुरूसिद्धया वाघमारे याची हत्या करण्यात आली आहे. तर या हत्या झालेल्या गुरूसिद्धया वाघमारे याच्या दोन्ही मांड्यांवर २२ नावं गोंदवली होती. गुरूसिद्धया वाघमारे याच्या दोन्ही मांड्यांवर असलेली २२ नावं त्या हत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला आहे. तर या हत्येला जबाबदार असलेल्या या २२ जणांच्या नावात काही कुटुंबातील तर काही इतर लोकांची नावं आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असाही उल्लेख मृत व्यक्तीने आपल्या मांड्यांवर ही नावं लिहितांना केला असल्याचे सांगितले जात आहे.