ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपुष्टात, यासह अधिक बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Jan 23, 2023 | 8:55 AM

लोखो शिवसैनिकांच्या महानायकाला अभिवादन, उद्धव ठाकरे यांचे बाळासाहेब यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त ट्विट, आजच्या कार्यक्रमातून विरोधकावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार...यासह अवघ्या 4 मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील अन्य घडामोडी...

उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत आज, 23 जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. शिवसेनेतील वादासंदर्भात निवडणूक आयोगाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर लिखीत युक्तीवाद सादर होणार असून प्रतिनिधी सभा आणि मुख्यनेते पदाबाबत आज ठाकरे गट लेखी म्हणणं पाठवणार असल्याची सुत्रांची माहिती…

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची आज दुपारी साडे 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार असून यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, कोणतीही युती झाली तरी भाजप आणि शिंदे गट हे एकत्रच रहाणार असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. लोखो शिवसैनिकांच्या महानायकाला अभिवादन, उद्धव ठाकरे यांचे बाळासाहेब यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त ट्विट, आजच्या कार्यक्रमातून विरोधकावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार…यासह अवघ्या 4 मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील अन्य घडामोडी…

Published on: Jan 23, 2023 08:33 AM
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीपार्क सजले, पहा हा खास व्हिडिओ..
घातपात की अपघात? नेमकं काय घडलं? बच्चू कडू यांनी उलगडा केला…