Sanjay Raut Live | दोन दिवसातले 24 तास संपले- संजय राऊत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसात बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. पाटील यांच्या या विधानाची राऊत यांनी खिल्ली उडवली. त्या दोन दिवसातील 24 तास संपले. आता 24 तास राहिले आहेत. वाट पाहा. ते काय भूकंप करतात ते पाहा.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसात बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. पाटील यांच्या या विधानाची राऊत यांनी खिल्ली उडवली. त्या दोन दिवसातील 24 तास संपले. आता 24 तास राहिले आहेत. वाट पाहा. ते काय भूकंप करतात ते पाहा. चंद्रकांत पाटील महाविकास सामिल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांच्या विधानवरून दिसू शकतं. तीन पैकी एका पक्षात ते प्रवेश करू असं पाटील यांना वाटत असेल, म्हणून त्यांना माजी राहणार नाही असं म्हटलं असावं. मुख्यमंत्र्यांनीही पाटील तीन पैकी एका पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते नागालँडमध्ये जाणार आहेत. राज्यपाल म्हणून.त्यांच्या अस्वस्थ मनामुळे त्यांना नागालँडच्या राज्यपालपदाची ऑफर दिली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.