नाशिकारांसाठी खुशखबर! आता शहरात धावणार इलेक्ट्रिक बस

| Updated on: May 07, 2023 | 11:38 AM

VIDEO | एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात लवकरच पहिल्या टप्प्यात दाखल होणार 25 इलेक्ट्रिक बस

नाशिक : राज्यातील एसटी (MSRTC) महामंडळाच्या काही विभागात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी एसटी महामंडळ एक पाऊल पुढे टाकत आपल्या ताफ्यातील बसेसमध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात देखील लवकरच पहिल्या टप्प्यात 25 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. त्यानुसार नाशिकच्या विभागीय एसटी कार्यालयात चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू आहे. नाशिकसाठी शंभर पेक्षा अधिक बीएस 6 अशा अद्ययावत बस मिळणार असल्याने नाशिककरांसाठी ही खुशखबर असणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत 25 बस दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईनंतर काही महिन्यांतच आता नाशिकमधून देखील इलेक्ट्रिक बस धावणार आहे.

Published on: May 07, 2023 11:38 AM
मणिपूर हिंसाचार : विद्यार्थी सुखरूप येतील, शरद पवार यांचे आश्वासन; मुख्यमंत्र्यांशी फोनाफोनी… पण
मालेगावात पाणी टंचाईच्या झळा, ‘या’ गावातील ग्रामस्थांची टँकरखाली ओंजळ