Congressचे 27 नगरसेवक Ajit Pawar यांच्या उपस्थितीत NCPमध्ये प्रवेश करणार -Tv9
महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे हे सगळे नगरसेवक येत्या 27 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
मालेगाव – महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे हे सगळे नगरसेवक येत्या 27 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर आपला पक्ष मोठा करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असल्याचे आपणास मालेगावमध्ये पाहावयास मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीत अस्थिर चित्र असल्याचं वारंवार आपण विरोधी पक्षांकडून ऐकतोय. परंतु मालेगावमध्ये नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे पाहून हे खरं वाटायला लागेल. कारण अनेकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यात जुळत नसून हे जास्त काळ टिकणार नाही असं म्हणाले होते.
मालेगावमध्ये काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे तिथं आपला मजबूत स्थान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी खेळी केल्याचं समजतंय. कारण तिथं काँग्रेसच्या सत्तेत असलेल्या 27 नगसेवकांनी राष्ट्रवादीकडून फुस लावली गेली. येत्या 27 तारखेला हे सगळे नगरसेवक मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं खात्रीलायक वृत्त आहे.