विधानसभेला 288 उमेदवार पाडणार, जरांगे पाटलांच्या आव्हानावर पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर

| Updated on: Jul 29, 2024 | 5:39 PM

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेत्या आणि नवनिर्वाचित बीडच्या आमदार पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. कोणतंही काम करताना बोलून दाखवायचं नसतं तर ते काम करून दाखवायचं असतं असं पंकजा मुंडे यांनी म्हटले असून २८८ उमेदवार पाडणार या जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार पाडायचे की लढवणार हे बैठकीत ठरवणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीत भूमिका ठरवणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेत्या आणि नवनिर्वाचित बीडच्या आमदार पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. कोणतंही काम करताना बोलून दाखवायचं नसतं तर ते काम करून दाखवायचं असतं असं पंकजा मुंडे यांनी म्हटले असून २८८ उमेदवार पाडणार या जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘२९ ऑगस्ट रोजी देशात अशी बैठक झाली नसेल अशी बैठक मराठ्यांची होईल. यादिवशी आम्ही ठरवणार की २८८ उमेदवार पाडायचे की लढवायेच. मी संपलो तरी चालेल, एक-दोन संपले तरी चालेल पण समाज संपायला नाही पाहिजे.’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.