एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकारकडून पुन्हा आश्वासन; ‘या’ तारखेलाच होणार पगार

| Updated on: Feb 28, 2023 | 7:54 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी झाला मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार हा ७ तारखेला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याच्या पाच तारखेा ३२० कोटी रूपयांचा निधी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला देण्यात येईल. या निधीमधून एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याचे वेतन त्या महिन्याच्या सात तारखेला देण्यात येणार आहे. यासह शिस्त आवदेन पद्धतीत बदल करून २०१७ सालापूर्वीच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

Published on: Feb 28, 2023 07:54 PM
अजित पवार यांनी ‘त्या’ जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले, अन् हा दिला सल्ला
‘अंकल…अंकल, काकींना नाव सांगेल हं…’, भर सभागृहात अजित पवार यांनी कुणाला डिवचलं, बघा व्हिडीओ