नवी मुंबईतील 35 हजार झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होणार? उदय सामंत यांनी बैठकीत काय केलं जाहीर?

| Updated on: Aug 24, 2023 | 10:27 PM

VIDEO | नवी मुंबईतील MIDC क्षेत्रात वसलेल्या 35 हजार झोपडपट्टांच आता होणार पुनर्विकास; एमआयडीसीच्या 130 हेक्टरवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचं बायोमेट्रीक करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | नवी मुंबईच्या एका शहर आणि दुसऱ्या बाजूस एमआयडीसी क्षेत्र आहे. एमआयडीसीच्या जवळपास १३० हेक्टरवर अनेक वर्षांपासून झोपडपट्टी आहे. नवी मुंबईतील एमआयडीसी क्षेत्रात वसलेल्या ३५ हजार झोपडपट्ट्यांचं पुनर्विकास आता होणार आहे. आजपासून एमआयडीसीच्या 130 हेक्टरवर वसलेल्या झोपडपट्ट्यांचं बायोमेट्रीक करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. दरम्यान, मंत्रालयात आज पार पडलेल्या बैठकीत एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एसआरएचे अधिकारी उपस्थित होते. येत्या 2 महिन्यात या 35 हजार झोपडपट्टांच बायोमेट्रिक पूर्ण करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धोरण जाहीर करणार.. मात्र 2010 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांनाच ही एसआरए स्कीम लागू असणार आहे.

Published on: Aug 24, 2023 10:27 PM
अजित पवार पुन्हा येणार? अजितदादा परत येण्याची किती शक्यता? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
इस्त्रोची कामगिरी अन् चंद्रावर भारत, भारतीय चांद्रयान ३ मोहिमेवरून भाजप विरूद्ध काँग्रेस