36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात बैठक पार पडली. यावर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
1) राज्यात उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कोकणात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
2) रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 1939 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 102 मीमी पाऊस झाला आहे.
3) मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगवंत बंधारा वाहून गेला आहे.तसेच उर्वरित बंधाराही वाहून जाण्याची शक्यता आहे.
4) बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर आता भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
5) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात बैठक पार पडली. यावर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.