36 जिल्हे 72 बातम्या | राज्यात आज, उद्या मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एकूण पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
36 जिल्हे 72 बातम्या |
1) राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एकूण पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2) कोल्हापुरात धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. सध्या नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
3) हिंलोली जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे जामगव्हाण गावामध्ये ओढ्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय .
4)रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आलाय.