36 जिल्हे 72 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
महाडमध्ये तळीये गावात दडर कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनेक जणांचे मृतदेही खाली वाहून गेले आहेत.
36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
1) महाडमध्ये तळीये गावात दडर कोसळून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनेक जणांचे मृतदेही खाली वाहून गेले आहेत.
2) तळीये गावातील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वेडट्टीवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आदी हजर होते.
3) दुर्घटनेच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पुनर्वसन करु. तुम्ही स्वत:ला सावरा, आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन येथील दुर्घटनाग्रस्त लोकांना दिले आहे.
4) तळीये दुर्घटनाग्रस्तांसाठी म्हाडा लवकरच दुसरं गाव वसवणार आहे, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली .