36 जिल्हे 72 बातम्या | दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.
36 जिल्हे 72 बातम्या |
1) नागपुरात संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काँग्रेसची बाईक रॅली संघ मुख्यालयाजवळ आल्यामुळे घोषणाबाजी करण्यात आली. ज्यामुळे शाब्दिक वाद आणि बाचाबाची झाली.
2) महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.
3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर जाणार आहेत. ते सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करतील.
4) मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आल्यामुळे धरणाचे पाणी गढूळ झाले आहे.
5) पर्यटन स्थळांवर गर्दी न करण्याचे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. तरीही काही नागरिक पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत.