36 जिल्हे 72 बातम्या | 36 district 72 News | 23 January 2022
राज्यात उद्यापासून अनेक भागातील शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावं असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. मुलांमध्ये हलकी लक्षणं आढळली तरी चाचणी करु घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाला करण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय.

पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.