36 जिल्हे 72 बातम्या | 6 October 2021
पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागांचा निकाला जाहीर होणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र सुरळीत मतदान पार पडले आहे. मात्र, 15 जिल्हा परिषदेच्या जागा पैकी डहाणू ताल्युक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहे.
पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागांचा निकाला जाहीर होणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र सुरळीत मतदान पार पडले आहे. मात्र, 15 जिल्हा परिषदेच्या जागा पैकी डहाणू ताल्युक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली. संख्याबळानुसार पालघर जिल्हापरिषद मध्ये सर्वाधिक महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणुकीत हे सर्व पक्ष एकमेकांसमोरासमोर स्वतंत्र लढले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ज्यांना कुणाला किती जागा मिळणार आहेत. त्यावर पालघर जिल्हा परिषद कुणाकडे हे चित्र स्पष्ट होणार आहे.