36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 19 October 2021
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या मुद्द्यावरुन चांगलाच राडा घातलाय. जिल्हा नियोजन बैठक सुरु होताच रवी राणा यांनी अमरावतीतील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत टाकावी, अशी मागणी करणारा ठराव पारित करावा अशी आग्रही मागणी केली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या मुद्द्यावरुन चांगलाच राडा घातलाय. जिल्हा नियोजन बैठक सुरु होताच रवी राणा यांनी अमरावतीतील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत टाकावी, अशी मागणी करणारा ठराव पारित करावा अशी आग्रही मागणी केली. त्यावरुन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
जिल्हा नियोजन समितीतील रवी राणा यांची आक्रमकता पाहून यशोमती ठाकूर यांनी पोलिस आयुक्तांना बोलवावं असं फर्मानच सोडलं. मात्र, रवी राणा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपण केवळ नौटंकी करत आहात, असा आरोप ठाकूर यांनी रवी राणांवर केला. त्यानंतर संतापलेले रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.