36 जिल्हे 72 बातम्या | 5 October 2021

| Updated on: Oct 05, 2021 | 9:36 AM

पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला.

पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहनतळावर लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते.

गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळतोय. तर मध्य महराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलाय. राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

Kolhapur | केंद्रीय पथकाचा आज राज्यात आढावा, कोल्हापुरातील नुकसानीची पाहणी करणार
Nandurbar ZP Elections | नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात