36 जिल्हे 72 बातम्या | 9 October 2021

| Updated on: Oct 09, 2021 | 10:36 AM

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेवर येऊन ठेपला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. माणसाने किती संकुचित असावं हे यातून दिसंत, असा टोला राणेंनी लगावलाय. तर राणेंच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 9 October 2021
VIDEO : उद्धव ठाकरे यांचं घणाघाती भाषण, राणेंच्या प्रत्येक टीकेला उत्तर