36 जिल्हे 72 बातम्या | 12 September 2021

| Updated on: Sep 12, 2021 | 10:04 AM

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मात्र अनेकदा विसंवाद पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर एका मुलाखतीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील जमीनदाराची उपमा दिली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसला टोले लगावले जात आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मात्र अनेकदा विसंवाद पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर एका मुलाखतीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील जमीनदाराची उपमा दिली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरु आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसला टोले लगावले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केलाय.

उद्धव ठाकरे यांनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दात सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांने आपल्याकडे भावना वक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नेमक्या कोणत्या नेत्याबाबत हा गौप्यस्फोट केला आहे, याबाबत नेमका अंदाज बांधणं कठीण आहे.

Ganesh Chaturthi 2021 | कोकणात गौरी आगमन, ड्रोनच्या माध्यमातून खास दृश्य
Nitin Gadkari | टार्गेट पूर्ण केलं तर फुलांची माळ देईन नाहीतर स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल : गडकरी