36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 1 September 2021
नांदेडमध्ये गोदावरी नदी पूरसदृश्य स्थितीत दुथडी भरुन वाहतेय. नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरातील स्मशानभूमीला नदीचे पाणी भिडलंय. नदीच्या वरच्या भागात म्हणजेच परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जादा असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालीय.
नांदेडमध्ये गोदावरी नदी पूरसदृश्य स्थितीत दुथडी भरुन वाहतेय. नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरातील स्मशानभूमीला नदीचे पाणी भिडलंय. नदीच्या वरच्या भागात म्हणजेच परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जादा असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याचे एकूण तीन दरवाजे उघडले आहेत. गोदावरीच्या या प्रवाहामुळे छोट्या ओढ्या नाल्याचे पाणी तुंबण्याची भीती आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलाय.
परभणीत मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असताना गुंज महामार्गावर स्कॉर्पिओ वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्या स्कॉर्पिओमध्ये गाडीत 7 प्रवासी अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.